
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे विकासाकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच अशोक गभणे, ग्रामपंचायत सदस्य माया लोधे, प्रमोद कामडी, संतोष धुर्वे रोजगार सेवक रत्नापुर, प्रविण कोठेवार आदी उपस्थित होते.
रत्नापुर येथे 15 सदस्यीय ग्रामपंचायत आहे. यात खांडला, सरांडी, पुरकेपार, इंदीरानगर आदी भागाचा समावेश होतो. सदर ग्रामपंचायतचे सरपंचपदी अशोक गभणे कार्यरत आहे. गावातील विकास कामाचे नुकताच भुमिपूजन सोहळा पार पडला. यात प्रामुख्याने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रत्नापुर ते शंकरपट आणि सरांडी ते नदीपर्यंत या दोन्ही पांदन रोडचे खडीकरण करने यांचा समावेश आहे. या कामाचे भुमिपूजन सरपंच अशोक गभणे, माया लोधे यांचे हस्ते पार पडले.














