
आंबेगाव प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
मंचर- पीडित कुटुंबांच्या डोळ्यातलं दुःखाचे अश्रू जर कोणाला दिसत असेल तर ते फक्त आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस ठाणे या ठिकाणी न्याय मागण्यासाठी लवांडे परिवार व मिरके परिवार यांना घेऊन वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून मंचर पोलीस ठाणे विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आले व आंदोलनामध्ये शेकडो संख्येने मिरके कुटुंब आणि लवांडे कुटुंब यांना न्याय मिळावा म्हणून भर उन्हात मंचर पोलीस ठाणे मुर्दाबाद, राज्य सरकार मुर्दाबाद, मांडगे P.I मुर्दाबाद, अशा घोषणा देऊन मंचर पोलीस ठाण्याकडे वळून मंचर पोलीस ठाण्यासमोर केला निषेध व्यक्त, परंतु आंबेडकरी जनतेची केली फसवणूक मंचर पोलीस ठाणे असून घोडेगाव चे पीएसआय किरण भालेकर यांना समोर आणून समाजाला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु भालेकर साहेबांच्या शब्दाला मान देऊन सर्व गोष्टी शासकीय पडताळणी करून लवकरात लवकर रिपोर्ट आल्यास कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करू असे आश्वासन घोडेगाव चे पीएसआय किरण भालेकर यांनी मंचर पोलीस ठाणे आंबेडकरी जनते समोर देण्यात आले. व दलित पीडित कुटुंबांनी सर्वांनी एकत्र येऊन P.I मांडगे यांची तक्रार करण्यात आली व महिलांना मंचर पोलीस ठाणे मध्ये गलिच्छ वागणूक मिळते अशी तक्रार सर्व महिलांनी मंचर पोलीस ठाणे मध्ये करण्यात आले. संगीता मिरके यांचा मुलगा मयत आदेश संदीप मिरके यांची निर्गुण हत्या करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलीस ठाणे यांनी केला आहे असा आरोप मिरके कुटुंब यांनी केला असून सखोल चौकशी व्हावा यासाठी पुन्हा पत्र देण्यात आले. व मयत आदेश संदीप मिरके यांची मयत घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी करण्यात आली व सर्व घटनास्थळी असणारे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरक्षक), पंकज सरोदे (तालुका उपाध्यक्ष), धनेश राजगुरू (संपर्कप्रमुख), शिवाजी राजगुरू (तालुका अध्यक्ष), अनिल गायकवाड (तालुका उपाध्यक्ष), मधुकर चाबुकस्वार (तालुका महासचिव) आतिश काका उघडे (भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा सचिव), तानाजी आस्वारे, सतीश ढोणे, राहुल ढोणे (भारतीय बौद्ध महासभा आंबेगाव तालुका), गणेश वाव्हाळ (तालुका अध्यक्ष), सागर जगताप (जुन्नर तालुका महासचिव), दिपाली साबळे (तालुका अध्यक्ष), संगीता मिर्के (तालुका उपाध्यक्ष), वैशाली खुडे (जुन्नर तालुका संघटक), सुरय्या शेख (निमगाव सावा अध्यक्ष), मुन्नी शेख (निमगाव सावा उपाध्यक्ष), निलेश देठे, देवा देठे, फकीरा देठे, विक्रांत आल्हाट सर्व पदधिकारी उपस्थीत होते.














