prabodhini news logo
Home चंद्रपूर रानबोथली बौद्ध समाज मंदीर भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

रानबोथली बौद्ध समाज मंदीर भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

0
99

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून १५ लाख रुपयांचा निधी मंजूर

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज

तालुक्यातील रानबोथली येथील दलित वस्तीमध्ये आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२४-२५ योजनेअंतर्गत समाज मंदिराचे भूमिपूजन दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाले.
ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे यांच्या हस्ते कुदळ मारून व श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून दलित वस्तीमध्ये समाजमंदिर बांधकामासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापूर्वी पण विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर करण्यात आला होता, परंतु बौद्ध समाज मंदीर बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्याने बौद्ध समाज मंदीराचे काम रखडले होते. तेव्हा विकासपुरुष विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून रानबोथली येथे बौद्ध समाज मंदीरासाठी जागा खरेदी करण्यात आली व आज दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी त्याच जागेवर बौद्ध समाज मंदीराचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव प्रा. डी. के. मेश्राम, सुधाकर पोपटे से.नी. मुख्याध्यापक जि. प. शाळा रानबोथली, जगदिश नाकतोडे माजी सरपंच रानबोथली, सचिन लिंगायत सरपंच रानबोथली, शिवाजी नखाते संचालक से. स. सं. चौगान, उत्तम पाटील नाकतोडे संचालक से. स. सं. चौगान, जनार्धन नाकतोडे संचालक से.स.सं. चौगान, सुधीर पंदीलवार संपर्क अधिकारी विजयभाऊ वडेट्टीवार जनसंपर्क कार्यालय ब्रम्हपुरी, रेवन भुते, अनिल हजारे बापूसाहेब व सर्व बौद्ध समाज मंडळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here