प्रेस क्लब सिंदेवाहीतर्फे गौरव सोहळा

0
124

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

प्रेस क्लब सिंदेवाहीच्या वतीने ‘दर्पण’ या पहिल्या वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून ‘गौरव सोहळा-२०२४’ चे आयोजन सिंदेवाही येथे करण्यात आले.

कार्यक्रमाला उ‌द्घाटक म्हणून नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, सहउद्घाटक तहसीलदार संदीप पानमंद, प्रमुख अतिथी म्हणून सदानंद बोरकर, ज्येष्ठ पत्रकार बाबुराव दुस्सावार, सिंदेवाही पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी अक्षय सुक्रे, तालुका कृषी अधिकारी अनिल महल्ले सामाजिक कार्यकर्ते तथा हेलपिंग हॅन्ड वर्क फौंडेशन चे संचालक निक्कू भैसारे, डॉ. केशव शेंडे, आय. सी आय. सी. आय फौंडेशन चे नवीन कपूर, प्रेस क्लब सिंदेवाही चे अध्यक्ष अमृत दंडवते, सचिव शशिकांत बतकमवार, उपाध्यक्ष राकेश बोरकुंडवार, सुधाकर गजभिये, प्रशांत गेडाम, संतोष नंनेवार, खालिद पठाण, अनिल येलकेवार, जितेंद्र बेलोरकर, शरद नैताम आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, कृषी, आरोग्य, पशु विभाग, स्थानिक व्यवसायिक क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रा.सदानंद बोरकर, डॉ.विनोद मानकर, डॉ. विनोद सुरपाम, रमाकांत लोधे, विजय सोयाम, एकता नागदेवते, डिंपल रामटेके, गौरी पेल्लारवार, युनूस शेख, प्रा. लेमदेव नागलवाडे, अरविंद मोहूर्ले, कृष्णा करकाडे, प्रेमजीवन गभणे, यांना
मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. तसेच गेली 40 वर्षे पत्रकारितेमध्ये घालविणारे ज्येष्ठ पत्रकार बाबुरावजी परसावार यांनी मागील सर्व बातम्या संग्रहित करून अल्बम तयार केले. त्या अल्बमचे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी सदानंद बोरकर यांनी, कुणाचे मन दुखवतील अशी पत्रकारिता नको. पत्रकारिता समाजाची संरक्षण भिंत असली पाहिजे. संवेदनशीलपणे समाजाची प्रामाणिक संरक्षण भिंत तयार झाली पाहिजे, अशी पत्रकारिता असायला हवी, असे मत व्यक्त केले.

संवेदनशील माणूस जेव्हा अस्वस्थ होतो, तेव्हा त्याला शब्दबद्ध करण्याचे काम वृत्तपत्र करीत असतो. त्यामुळे पत्रकारिता ही डोळस असावी, समाजातील वाईट प्रवृत्तीवर प्रहार करणारी असावी. कुणाचेही मन दुखावणारी नसावी. पत्रकारांनो पत्रकारितेमधून संवेदनशील समाजाची प्रामाणिक भिंत बना. असेही प्रा. सदानंद बोरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून परखड मत व्यक्त केले.

प्रा. दिलीप लोडल्लीवार यांनी, आज पत्रकारिता क्षेत्रात अनेक तरुण व होतकरू मंडळी सहभागी होत आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे, असे विचार प्रास्ताविकातून व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेस क्लबचे समस्त पदाधिकारी व सदस्य यांनी सहकार्य केले. संचालन राकेश बोरकुंडवार यांनी, तर आभार सुधाकर गजभिये यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here