दि.१९,२० व २१ जानेवारी २०२४ ला विविध कार्यक्रमाचे आयोजन.
जास्मिन शेख
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
चंद्रपुर : चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्र येथील श्री. गुरूदेव सेवा मंडळ, ऊर्जानगरच्या वतीने स्नेहबंध सभागृह येथे वंदनिय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराजांचा ५५ वा व वैराग्यमुर्ती कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा ६७ वा स्मृतीदिन महोत्सव दिनांक.१९, २० व २१ जानेवारी २०२४ ला आयोजित केला आहे. वंदनिय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराजांनी सांगीतलेले ग्रामगीतेतील तत्वज्ञान जनता – जनार्धनापर्यत पोहचविण्याकरीता तीन दिवस विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि.१९ जानेवारीला सकाळी ५:३० वा. सामुदायिक ध्यानपाठ व चिंतन, ६: ३० वा. परिसर स्वच्छता, १० वा. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व कलश पुजन, स. १०:१५ वा. भव्य रांगोळी स्पर्धा, दुपारी १२ वा. शुभांगी अमनुलवार याचे अध्यक्षतेत “महिला संमेलन”, याचे अर्चना कुमरवर याचे हस्ते उदघाटन होणार आहे. सुश्री रेखाताई बुराडे भूवैकुंठ अड्याळ टेकडी,डाँ. अर्चना निमकर चंद्रपूर,रोशनी धांडे व वैशाली फुलकर पक्षी निरीक्षक ह्याचे महिला संमेलनाला मार्गदर्शन करणार आहेत. सायं.६ वा सामुदायिक प्रार्थना व सायं ७ वा भव्य प्रबोधन कार्यक्रम मा.आकाश ताले सप्तखंजिरी वादक युवा प्रबोधनकार नागपूर
शनिवार दि. २० जानेवारीला स ५:३० वा. सामुदायिक ध्यानपाठ व चिंतन, सकाळी ८:०० वाजता “सर्वधर्म ग्रंथादिंडी व भव्य मिरवणूक”, सहभाग : विद्यामंदिर हायस्कूल तथा विद्या निकेतन हायस्कुल ऊर्जानगर. दुपारी १ ते ४ आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर सहभाग डाँ. अमित ढवस व टीम चंद्रपूर, सायं ५:०० वाजता सामुदायिक प्रार्थना, सायंकाळी ६:०० वाजता एकेरी गीत गायन संमेलन व ग्राम गीता पठण.
रविवार २१ जानेवारीला स ५:३० वा. सामुदायिक ध्यानपाठ व चिंतन, सकाळी ६:३० वाजता “सामुदायिक ग्रामगीता वाचन, सकाळी ७ ते ३ वाजेपर्यंत भव्य महिला व बाल खंजिरी भजन संमेलन याकरिता प्रवेश दुपारी १:०० वाजेपर्यंत देण्यात येईल.सोबतच सकाळी ९ वाजता पासून चित्रकला स्पर्धा घेण्यात येईल. दुपारी ३:३० वाजता “श्रद्धांजलीपर भजन” सादरकर्ते श्री गुरूदेव सेवा भजन मंडळ, ऊर्जानगर, सायं ठीक ४:५८ मि. नी वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना “मौन श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे नंतर सर्वधर्मीय प्रार्थना” नंतर लगेच सामुदायिक प्रार्थना, मा.मुरलीधर गोहणे यांच्या अध्यक्षतेखाली व मा.गिरीश कुमरवार उदघाटक तसेच प्रमुख अतिथी श्याम राठोड यांच्या उपस्थितीत सायं ६:०० वा राष्ट्रसंत व्याख्यानमाला व विविध स्पर्धेचे “बक्षिस वितरण” होणार आहे.तरी याचा ऊर्जानगरवासीय व परिसरातील आबालवृंदांनी,गुरुदेवप्रेमींनी, माता-भगीनिंनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे श्री. गुरूदेव सेवा महिला व पुरुष मंडळ ऊर्जानगर तर्फ आवाहन करण्यात येत आहे असे देवराव कोंडेकर यांनी कळविले आहे.

