कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर श्री. महालक्ष्मी मंदिर परिसरात इको पार्क तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता तारेचे कम्पाउंड व मोठे प्रवेशद्वाराचे बांधकाम केले आहे. मात्र सध्या स्थितीत ते शोभेची वस्तू बनली आहे. इको पार्कची सुविधा केव्हा सुरू होणार, याकडे नगरवासीयांचे लक्ष लागले आहे.
शहराच्या विकासाचे दृष्टीकोनातून सौंदर्यकरणात भर पडावी याकरिता तालुक्याचे ठिकाणी इको पार्क मंजूर करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका स्तरावर केलेले इको पार्क मंजूर सिंदेवाही येथे करण्यात आले. किन्ही जवळ असलेल्या जागेवर काम सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात बारा एकर जागेचा प्रस्ताव केला असून, इको पार्क मंजूर आहे. यासाठी भव्य प्रवेशद्वार बांधले आहे. जागेच्या सभोवताल ताराची संरक्षण भिंत तयार केली आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत मोठे प्रवेशद्वार
शोभेची वस्तू बनली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने नागरिकाना प्रवेशद्वाराला झाडा-झुडपांचा विळखा वाढलेला दिसत आहे. त्यामुळे येथे इको पार्क केव्हा उदयास येईल अन् नागरिकांना केव्हा प्रवेश मिळणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.निसर्गरम्य परिसरात इको पार्क ची मंजुरी देण्यात आली परंतु अजूनही काम झाले नसल्याने झाडा झुडपाच्या विळख्यात आहे.

