लॉयडस मेटल कंपनीचा प्रदुषणामुळे नागरिकांमध्ये चक्कर चे प्रमाण वाढले.

0
33

जास्मिन शेख
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

घुग्घुस – येथील लॉयडस मेटल एनर्जी प्रा. लि. कंपनी ही वारंवार होणाऱ्या प्रदुषणामुळे चर्चेतच असते. लॉयडस मेटल कंपनीचा प्रदुषणामध्ये लोह्याचे कण सुध्दा बाहेर येतात. त्यामुळे या लोह्याचा कणामुळे भविष्यात घुग्घुस येथील नागरिकांना खुप मोठ मोठ्या आजारांना समोर जावे लागेल.
या प्रदुषणामुळे घुग्घुस येथील नागरिकांना कॅन्सर, टिबी, दमा, खोकला, अशा अनेक आजारापासून घुग्घुस येथील नागरिक त्रस्त आहे.
आज दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी सफेद झंडा कामगार संघटनांचा माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांना आणखी निवेदन देऊन त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले. घुग्घुस येथील नागरिकांमध्ये चक्कर येणे व मायग्रेनचा त्रास सुध्दा या घुग्घुस मधील नागरिकांमध्ये दिसुन येते आहे. या प्रदुषीत कंपनीवर हे अधिकारी कारवाई करण्यात मागेपुढे का पाहत आहे. हे मात्र समजने अवघड झाले आहे.
या लायडस मेटल कंपनीचा प्रदुषणामुळे नागरिक त्रस्त झाले असून घुग्घुस येथील नागरिकांची तपासणी करून कारवाई करुन कंपनीला घुग्घुस शहराचा दहा किलोमीटर दुर बाहेर करण्यात यावे अशी मागणी सुध्दा यावेळेस करण्यात आली.
या कंपनीवर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर कार्यालयाचा समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here