देशबंधुग्राम गावातील गावकऱ्यांची चर्चा करत जाणून घेतल्या स्थानिकांच्या समस्या
रुपाली रामटेके
विशेष जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली
मूलचेरा:- तालुक्यातील भावणीपुर व देशबंधुग्राम येथील मंदिर परिसरात आयोजित महानाम संकीर्तन व भागवत सप्ताह कार्यक्रमाला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी उपस्थित राहून पूजन करत आशीर्वाद घेतले.
मुलचेरा तालुक्यातील 22 गावांत बंगाली बांधवांची संख्या मोठी असून येथील विविध गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भावणीपुर व देशबंधुग्राम येथे महानाम संकीर्तन व भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.१४ ते १८ जानेवारी दरम्यान आयोजित कार्यक्रमास १७ जानेवारी रोजी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेट देऊन पूजन करत आशीर्वाद घेतले.गावातील संकीर्तन कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून या कार्यक्रमासाठी देणगी दिले.आणि समस्त देशबंधुग्राम गावातील गावकऱ्यांची समस्या जाणून घेतली. माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी यावेळी गावातील स्थानिक समस्या लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करनार असे आश्वासन येथील गावकऱ्यांना दिले.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संजीव सरकार,शहर अध्यक्ष दिलीप आत्राम,जिल्हा सचिव बादल शाह,महामंत्री सुभाष गणपती,भाजप तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे तसेच गावातील ग्रा प सदस्य,कमिटीचे सदस्य तसेच भाजपचे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

