डिगोळ परिसरातील पिके पिवळी पडली
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ परिसरातील विहिरी बोअरवेल च्या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारी चे पिके जोमात आली असताना कुपनलिकाचे व विहिरी चे पाणी अचानक कमी झाल्याने सोन्यासारख्या ज्वारीचे पिके पाण्याअभावी वाळून जात असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे डिगोळ परिसर हा डोंगराळ भाग असून जमिनी हालक्या स्वरूपाच्या आहेत या परिसरातील शेती उत्पादन पाण्यावर अवलंबून आहे.गेल्या दोन वर्षांपासून पाऊस काळ कमी होत असल्याने या परिसरातील शेतकरी वर्गानी विहिरी 50 फुट तर बोअरवेल 500 ते 600 फुट घेतले आहेत परंतु जमिनीत पाणी नसल्याने विहिरी कोरड्या पडत आहेत तर बोअरवेलही कोरडेच पडत असून नुसता बुगाच निगत असल्याने शेतकरी निराश होऊन संकटात सापडला आहे.
हा परिसर डोंगराळ भाग असूनही रब्बी हंगामातील पिके घेतल्याने हा परिसर आक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात हिरवा गार झाला होता परंतु डिसेंबर महिन्यात अनेक शेतकऱ्यांचे पाणी कमी झाले तर काही जणाचे चक्क च बंद पडले आहेत.पाण्याअभावी ज्वारी गहू हरभरा हि पिके वाळून जात असल्याने शेतकरी राजा अनेक संकटांवर सामना करित आहे.
ज्वारीचे व गव्हाचे पिके भर पोटऱ्यात व जोमात आले आहेत परंतु पाण्याअभावी दाणे होप होणार असून वाळून पिके जात आहेत.
पाण्याअभावी शेतातील पिके तर गेलीच परंतु माणसाना व जनावरांना पिण्यासाठी पाणी मार्च एप्रिल मे महिन्यात मिळते की नाही असा शेतकरी संकटात सापडला असून जनावरे बाजारात विकण्याची वेळ आली आहे.
टिप-
पाण्याअभावी विहिरी व बोअर बंद पडले असून शेतातील होण्यासारखी हिरवेगार पिके वाळून जात असून परिसर पिवळा पडला आहे.शेतातील हिरवे पिके पाण्याअभावी पिवळी होत असून शेतकऱ्यांना पाण्याअभावी उदास झाला आहे. जनावरांना व माणसांना दोन महिन्यांत पाणी तरी पिण्यासाठी मिळेल का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.- रहिम शेख शेतकरी डिगोळ

