अंतरगांव येथील जागर युवा शक्ती ग्रुपद्वारे कार्यक्रमाचे आयोजन
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील अंतरगाव या ठिकाणी जागर युवा शक्ती ग्रुपद्वारे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई जयंती साजरी करण्यात आली. या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. जितेंद्र बेलोरकर तर उदघाटक दिपाली ढाले सरपंच, प्रमुख पाहुणे प्रवीण कांमडी उपसरपंच, कृष्णाभाऊ कामडी, प्रवीण कामडी, संतोष शेंडे,शेखर मामीडवार, प्रा. प्रवीण गिरडकर, अतुल ढाले,रुपेश ठीकरे, अरुण सावसाकडे, सुनंदा नन्नावरे, शबाना शेख, रागिनी कुळमेथे, मनीष पुस्तोडे इत्यादी उपस्थित होते.स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांची जयंती कार्यक्रमानिमित्त बोलत असताना प्रा. जितेंद्र बेलोरकर म्हणाले कि, सार्वजनिक कार्यक्रमातून समाज एकत्र येतो त्यातून संघटन निर्माण होतो. कार्यक्रमानंतर बालकलाकारांचे नृत्य कार्यक्रम घेण्यात आले .कार्यक्रमाचे संचालन मनोज भोयर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता पंकज आबोरकर, सतीश आंबोरकर, हितेश कामडी ,अक्षय ढाले, रविंद्र ननावरे, राकेश ठीकरे, सूरज देशमुख, आशिष आंबोरकर, किशोर शेन्द्रे आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रम पाहण्याकरीता संपूर्ण अंतरगांव येथील गांवकरी उपस्थित होते.

