महाराष्ट्र कामगार युवा पँथर्स संघटनेच्या वतीने महामोर्चा संपन्न

0
47

बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज

देवणी: महाराष्ट्र कामगार युवा पँथर्स संघटनेच्या वतीने तालुक्यातील मजुरांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढन्यात आला त्यात मजुरांना महिना पाच हजार रुपये सन्मान वेतन द्या संगायो इंगायोच्या लाभार्थ्यांना मानधनात वाढ करा नव्याने बांधकाम केलेल्या न्यायालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा मुस्लिम समाजातील गरीब लोकांना 5%आरक्षण देण्यात यावे अण्णा भाऊ साठे महामंडळकडून देण्यात येणाऱ्या कर्ज प्रकरणातील जाचक अटी रद्द करण्यात याव्या नगर पंचायत घनकचरा व्यवस्थापनात काम करणाऱ्या महिलांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे प्रधान मंत्री व रमाई अवास योजनेसाठी चार लाख रुपये सानुग्रहाय अनुदान द्यावे अश्या मागण्या तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या हा मोर्चा पंचायत समिती कार्यलयापासून तहसील कार्यालयावर काढण्यात आला.

या उपस्थित कामगार मजुरांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी बनसोडे, अक्षय शिंदे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी,गणेश कांबळे, आत्माराम गायकवाड इत्यादी ने मार्गदर्शन केले आपल्या मागण्या चे निवेदन मंडळ अधिकारी अनिता ढगे मॅडम यांना देण्यात आले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठ महादेव कांबळे, अक्षय शिंदे,आत्माराम गायकवाड, संदीप सूर्यवंशी,संतोष आवळे,रणजित कांबळे , रत्नदीप गायकवाड, सिद्धार्थ कांबळे,प्रितम वाघमारे सह अनेक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here