उषा नाईक
विदर्भ संपादक
प्रबोधिनी न्युज
अमरावती-आज दिनांक 19/01/2024 रोजी जिल्हा सामान्य रूग्णालय अमरावती येथे आयुष्यमानभव भारत मिशन अंतर्गत डाॕ. गाढवे सहा. संचालक अकोला यांच्या आदेशान्वये व डाॕ. शरद जोगी जिल्हा हिवताप अधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनात अंडवृध्दी रूग्ण शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण 15 रूग्ण भरती करण्यात आले होते. तपासणीअंती 12 रूग्ण शस्त्रक्रियेकरिता पात्र ठरले. त्यापैकी 9 रूग्णावर डाॕ.राऊत साहेब व डाॕ. चाकोरे साहेब (सर्जन) यांच्या अथक परिश्रमाअंती शस्त्रक्रिया करण्यात आली.व 3 रूग्णाची शस्त्रक्रिया उद्या करण्याचे प्रस्तावित आहे.
या प्रसंगी दिनेश भगत साहेब जिल्हा हत्तीरोग अधिकारी अमरावती, डाॕ. जुनेद, वावरे, तोंडरे, दातीर , राठोड, माहुरे, बरडे, मनोहर, सोमवंशी, झाडे, वानखडे, चव्हाण, दिवाण इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

