प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर- नुकतेच मुंबई येथे दिनांक १२-१-२०२४ ला टिळक भवन येथे झालेल्या जिजामाता जयंतीनिमित्त कर्तबगार महिला पुरस्कार सोहळ्यात सारिका उराडे यांची तळागाळातील उत्कृष्ट समाजसेविका म्हणून निवड करण्यात आली. सारिका ताईंचे समाजकार्य लक्षात घेता त्यांच्या कार्याला तोड नाही.शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे आणि त्या योजनेचा लाभ मिळवून देणे, हे त्यांच्या कार्याचे स्वरूप गडचिरोली सारख्या आदिवासी दुर्गम भागात जाऊन भजन कीर्तन प्रेमी, वृद्ध कलावंतांना वृद्ध मानधन योजना समजावून त्यांना लाभ मिळवून देणे कलावंतांच्या प्रत्येक अडचणी सोडवणे त्याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करणे, व्यसनमुक्ती जनजागृती अभियान, महिला सक्षमीकरण, सर्व शिक्षा अभियान, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, सुंदर माझे गाव यासारखे अनेक उपक्रम आपल्या सर्वांगीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या माध्यमातून राबविले आहे. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून आत्तापर्यंत त्यांना आदर्श शिक्षिका सावित्रीबाई फुले पुरस्कार, मदर तेरेसा पुरस्कार, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याचप्रमाणे कलावंतांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कलावंत नोंदणी अभियान राबवून वृद्ध कलावंतांच्या आधारस्तंभ म्हणून सारिका ताईंची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी(सांस्कृतिक विभाग) प्रदेशाध्यक्ष सौ. विद्याताई कदम यांनी जिजाऊ माता पुरस्कारासाठी निवड केली. आणि माननीय प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सारिका ताईंच्या पुढील वाटचालीस शुभेच्छुक..
मा. सोमनाथ गायकवाड (नाशिक), मा.जगदीश दादा सोनवणे (नाशिक), मा. एड. श्याम खंडारे(यवतमाळ), मा. नरेंद्रजी सोनारकर, मा.संजय वाळवे, मा. तुकाराम कोंडेकर, मा. आबाजी भोयर, मंगला गडगिलवार, मा. देवरावजी खांडेकर, मा. जीवनदास किन्हेकार, मा. वसंतराव मंदाडे, मा. बाबुराव धंदरे, सचिन आत्राम, भजनलाल, राहुल पेंढारकर, यशवंत उराडे, राशी उराडे, सावरी बडोले, मा.उमाकांत भगवानदास बडोले. इत्यादींनी अभिनंदन केले.

