उदगीर जवळ अपघात ; हंडरगुळीचा युवक ठार ; दोन मुलींचा गेला आधार

0
299

उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

हंडरगुळी- उदगीरच्या तोंडार साखर कारखान्या समोर हकनकवाडी पाटीजवळ दोन दुचाकींची अमोरासमोर धडक बसली व ही धडक एवढी भयानक होती.की या धडकेत हंडरगुळी ता.उदगीर चा रहिवाशी रवी बालाजी गोटाळवाड वय २८ हा जागीच ठार झाला.तर दुसर्र्या दुचाकीवरचा व्यक्ती हा जबर जख्मी झाला असुन,जखमी इसमावर उपचार सुरु आहेत.ही घटना दि.२५ रोजी म्हणजे २६ जानेवारीच्या पुर्व-संध्येला घडली असुन मयत रवी हा 2 चिमुकल्या मुलींचा पिता होता.आणि त्याच्या अपघाती निधनाने चिमुकल्या मुलींचा व आई=वडीलांचा एकमेव आधार काळाने हिरावला असल्याने परिसरात हळहळ व दु:ख व्यक्त केले जात आहे. मयत रवी हा लाईट फिटींगचे उदगीर मधील काम आटोपुन गुरुवारी सायं 6 वा.दरम्यान हंडरगुळीकडे येत होता.व समोरुन एक पुलिसवाला उदगीरकडे जात होता.दरम्यान दोन ही दुचाकी उदगीर शहरापासुन जवळ असलेल्या अशोका पॅलेस हकनकवाडी पाटीच्या जवळ येताच सायं.अंदाजे 6-15 वा. दरम्यान दोन्ही दुचाकींची एकमेकांना अमोरासमोर धडक बसली.व यामध्ये रवी ठार झाला.तर पुढून येणारा एक पुलिसवाला जबर जख्मी झाला आहे मयत रवीचे २६ जानेवारी रोजी शव – विच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. व दि.२६ रोजी हंडरगुळी येथे मयत रवीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.तत्पुर्वी व्यापा-यांनी बाजारपेठ बंद ठेवुन सर्वांचा लाडला असलेल्या रवीला साश्रुनयनांनी अंतिम निरोप देण्यात आला.मयत रवि हा आइ,वडीलांचा एकुलता एक व कमावता मुलगा होता.व 2 छोट्या मुलींचा तसेच मजुर कुटूंबाचा एकमेव कमावता आधार काळाने हिरावल्याने सर्वञ हळहळ व्यक्त होत असुन रवी च्या कुटूंबास शासनाने मदत करुन आधार देणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here