सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य सुरू आहे. या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्या मध्ये, सर्व तालुका शाखा, शहर शाखा च्या वतीने दिनांक 29 जानेवारी 2024 ला EVM हटाव भारत देश बचाव हा नारा घेऊन ईव्हीएम मशीन बंद करण्याबाबत भारताच्या राष्ट्रपतीला, पंतप्रधानाला तसेच निवडणूक आयोगाला एकाच दिवशी निवेदन दिले.
चंद्रपुर येथे आज दी 29 जानेवारी 2024 सोमवार ला भारतीय बौद्ध महासभा चंद्रपुर जिल्हा पचिम शाखा च्या वतीने मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालयात दुपारी 2.30 वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, सर्व बौद्धाचार्य, समता सैनिक दल चे पदाधिकारी व सैनिक तसेच संस्थेच्या सदस्य असे एकूण 288 सह्याची निवेदन देण्यात आले.
या करिता नेताजी भरणे जिल्हाध्यक्ष, संदीप सोनोणे जिल्हा उपाध्यक्ष, प्रफुल भगत जिल्हा उपाध्यक्ष, सपना कुंभारे जिल्हा उपाध्यक्ष, गुरु बालक मेश्राम जिल्हा सचिव, जगदीश आघात जिल्हा सचिव, डॉ विनोद फुलझेले चंद्रपूर शहर अध्यक्ष, किशोर तेलतुंबडे सरचिटणीस, शेषराव सहारे केंद्रीय शिक्षक, प्रगती मेश्राम केंद्रीय शिक्षिका, उषा तामगडे केंद्रीय शिक्षिका, टी डि शेंडे संघटक, कृष्णकांत गजभिये तसेच जिल्हा शाखा व चंद्रपूर शहर शाखा चे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते..

