कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही च्या वतीने दिनांक ३०/०१/२०२४ ला आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर ग्रामपंचायत विरव्हा ता.सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला. मा. अध्यक्ष महोदय योगेंद्र जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटनिय कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मनोहर नन्नेवार सहसचिव विद्या प्रसारक संस्था सिंदेवाही यांच्या हस्ते महात्मा गांधी व माता सरस्वती यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून पार पडला.या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. राजेश जी डहारे, ग्रामपंचायत सरपंच छाया चौधरी, उपसरपंच सुनिता मडावी, सामाजिक कार्यकर्ता रामदासजी शेंडे, पोलीस पाटील राजेंद्र सावसाकडे,उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तामदेव कावळे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेश डहारे यांनी केले.
त्यानंतर मा. मनोहर नन्नेवार सहसचिव विद्या प्रसारक संस्था सिंदेवाही यांनी उद्घाटन पर भाषणात मोलाचं मत मांडले. त्यानंतर तामदेव कावळे मुख्याध्यापक उच्च प्राथमिक शाळा विरव्हा यांनी शिबिरासंबंधी माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ता रामदासजी शेंडे यांचे मार्गदर्शन झाले त्यानंतर विरव्हा गावचे प्रथम नागरिक छाया चौधरी यांनी शिबिरार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला माननीय अध्यक्षीय भाषणात मा.योगेंद्र जैस्वाल अध्यक्ष विद्या प्रसारक संस्था सिंदेवाही यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. लेमदेव नागलवाडे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी शिबिरासंबंधी माहिती दिली व गावातील लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले नंतर राष्ट्रगीताने उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली.

