संघर्ष भगत
झरी प्रतिनिधी
झरी- आज दि. ३०/०१ /२०२४ रोजी सर्व विद्यार्थी , पालक तसेच मान्यवर व ग्रामवासीयांच्या उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. त्यानिमित्य आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्व विद्यार्थी तसेच पालक आणि सर्व ग्रामवासीयांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. आनंद मेळावा या वेळी वेळ सायंकाळी ठिक 3.00 ते 5.00 वाजता विद्यार्थ्यांनी पदार्थ बनवून स्टॉल लावले. यासाठी महिलांनी मुलांना मदत केली. पदार्थाचे नाव व किंमतीचे बोर्ड लावण्यात आले. सर्व पालक आणि ग्रामवासी यांनी पदार्थ खरेदी करून आस्वाद घेतला.
विद्यार्थ्यांना व्यवहार करण्याची संधी मिळाली. सर्वांनी भरभरून आनंद घेतला. स्वतः व्यवहार करून केलेल्या कमाईचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर झळकत होता. सांस्कृतिक कार्यक्रम वेळ रात्री ठिक ८.00 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य तसेच संरपंच, उपसरपंच सर्व सदस्यगण, पोलीस पाटील, अध्यक्ष तंटा मुक्ती समिती व समस्त ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, आणि गीत गायन इत्यादी कला प्रकार सादर केले. पालकांनी मुलांच्या डॉन्स साठी तयारी करण्यासाठी मदत केली. आपण सर्व ग्रामवासीयांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन दिले भरघोस बक्षिसे दिली. त्यांचा आनंद द्विगुणित केला. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार

