अनेकांनी केले निमगडेंच्या नियुक्तीचे स्वागत
जास्मिन शेख
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
पोलिस बाॅईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर पदमाकर निमगडे यांची पोलिस बाॅईज असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सदरहु नियुक्ती ही दि.1-2-24 ते 1-2-25 या कालावधीसाठी असून सदरहु नियुक्ती महाराष्ट्र राज्य पोलिस बाॅईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी केली आहे.निमगडे यांचे आज पर्यंत या संघटनेतील कार्य अतिशय उल्लेखनिय असल्यामुळे त्यांची या पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. दरम्यान त्यांचे या नियुक्तीचे चंद्रशेखर मुरस्कर, प्रमोद नागपुरे, देविदास बोबडे, बशीरभैया अन्सारी, स्वप्नील क्षिरसागर , संजय खोब्रागडे,साहिल मडावी, लखन बावणे, दिलीप उरकूंदे,या शिवाय स्मिता दाते, राजश्री गेडाम, कविता तिमा सुनीता बावणे, सविता खुटेमाटे, अनिता बोनगीरवार, कल्पना जेनेकर, शंकुतला शेडमाके संगीता जुमनाके, नलू राऊत, संगीता कुडावले यांनी स्वागत केले आहे.

