नागपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
नुकतीच सकाळ समूह यंग इन्स्पिरेशन अर्थात युवा संसद महाराष्ट्र भर पार पडली आणि नागपूर विद्यापीठ मधून अनेक नामांकित महाविद्यालय यांच्यात अर्ज दाखल केला होता
याच ग्रामीण भागातील युवक श्रीकांत राजपंगे हे मातृ सेवा संघ समाज कार्य महाविद्यालय नागपूर इथून नेतृत्व करत इन सकाळ समूह यंग इन्स्पिरेशन मध्ये आपला अध्यक्ष म्हणून अर्ज दाखला केला होता.
सर्वत्र महाविद्यालय शिक्षकांनी व विद्यार्थी यांनी सहकार्य करून या निवडणुकीमध्ये मतदान करून आपल्या महाविद्यालयाचा अध्यक्षसाठी निवड करून इन समूहासाठी प्रेरित केले आणि निवडून दिले व त्या नंतर नागपूर येथे महाविद्यालयीन सर्व अध्यक्ष विद्यार्थी यांची के.डी.के महाविद्यालय नागपूर
इथे महाराष्ट्र लेव्हलवर तथा विदर्भ लेवलवर लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, मुलाखत, नेतृत्व विकाससाठी वकृत्वस्पर्धा,
यानंतर सहा विद्यार्थ्यांची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात आले त्या ठिकाणी जिल्हा लेवल सर्व पदी वितरित करण्यात आले आणि त्यानंतर सेंटर लेव्हलवर मुलाखत घेण्यात आले व त्याचत सहा विद्यार्थी यांची निवड करून पदभार देण्यात आला. व ग्रामीण भागातला एक युवा युवक महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष पद मिळवलं.
त्याला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा “मी अतिशय दुर्गम भागातला असल्यामुळे मी समाजकार्याचे शिक्षण घेत आहे कारण माझ्यामुळे भरपूर जणाला फायदा होऊ शकतो ग्रामीण भागात अशिक्षता, व्यसनाधीनता, अनेक समस्या आढळून येतात मला वाटलं या इन च्या माध्यमातून माझं नेतृत्व विकास होऊ शकतो आणि मी काय तरी करू शकतो ही मला माझ्या कडून अपॆक्षा आहे”- श्रीकांत राजपंगे

