वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्षपदी शरद मल्हारी पाईकराव नियुक्ती

0
44

सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादिका
प्रबोधिनी न्युज

घुग्घुस – वंचित बहुजन आघाडी VBA घुग्घुस शहर अध्यक्ष पदी शरदभाऊ मल्हारी पाईकराव यांची निवड करुन घुग्घुस शहराचा पदभार देण्यात आला.
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदनीय रेखा ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा. प्रा. सोमाजी गोंडाने, जिल्हा महासचिव पश्र्चिम, ऍड.अक्षय लोहकरे, जिल्हा महासचिव पश्र्चिम, मधुकर उराडे तालुकाध्यक्ष, धर्मेंद्र शेंडे, यांच्या नेतृत्वात घुग्घुस येथे दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी मिटिंग आयोजित करण्यात आली होती.
या मिटिंग मध्ये वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर कार्यकारिणीची निवड करुन. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरनीय रेखा ठाकुर यांच्या कडे पाठविण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष यांनी दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्षपदी शरदभाऊ मल्हारी पाईकराव यांची निवड करुन शहरातील कार्यकारिणी जाहीर केली.
घुग्घुस शहर कार्यकारिणी खालील प्रमाणे पदभार देण्यात आला.

घुग्घुस शहर अध्यक्ष, शरद मल्हारी पाईकराव, उपाध्यक्ष, जगदीश भीमसेन मारबते, उपाध्यक्ष, दत्ता विठ्ठल वाघमारे, महासचिव, योगेश किशोर नगराळे, संघटक, राकेश अशोक पारशिवे, कोषाध्यक्ष, अशोक काशीनाथ भगत, IT सेल प्रमुख, आशिष रमेश परेकर, सदस्य, विशाल नारायण भगत, सदस्य, नकुल किसन निमसरकर यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रा. सोमाजी गोंडाने यांनी सर्वाचे स्वागत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिल्हाध्यक्ष यांना नवनियुक्त घुग्घुस शहर अध्यक्ष शरदभाऊ पाईकराव यांनी आश्वासन दिले. कि येणाऱ्या निवडणुकीत घुग्घुस शहर मध्ये आपल्या वंचित बहुजन आघाडीचा नगराध्यक्ष बसविणार व आंबेडकरी चळवळीला सामोर घेऊन जाणार असे आश्वासन दिले .
यावेळेस जिल्हा महासचिव पश्र्चिम मधुकर उराडे , जिल्हा महासचिव पश्र्चिम ऍड.अक्षय लोहकरे , जिल्हा संघटक दिव्यकुमार बोरकर तालुकाध्यक्ष धर्मेंद्र शेंडे, हे प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here