दयावान सरकार महाराष्ट्र राज्य च्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान

0
113

समाजाची बांधिलकी जपत पोलीस हेड कॉन्स्टेबल लखनसिंह ठाकुर यांनी केले गरजू रुग्णास रक्तदान

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

परभणी – शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे अपेंडिक्स या आजारावर उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णासाठी बी पॉझिटिव रक्तगटाच्या रक्ताचे अत्यंत आवश्यकता होती. हे बी पॉझिटिव्ह रक्तगटाचे रक्त जिल्हा सामान्य रुग्णालयातील मेट्रो ब्लड बँक येथे उपलब्ध नसल्या कारणाने ते रक्त उपलब्ध करून देण्यासंदर्भात रुग्णाचे नातेवाईक यांनी आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे यांना संपर्क साधून रक्त उपलब्ध करून देण्यासंदर्भात मदत मागितली.

तेव्हा प्रमोद अंभोरे यांनी दयावान सरकारच्या वतीने व्हाट्सअप या सोशल मीडियावर रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. दयावान सरकारच्या आवाहनाला हाक देत. परभणी येथील महाराष्ट्र पोलीस दलातील बॉम्बशोधक व नाशक, डॉग स्कॉड पथक पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथील कर्तव्यदक्ष हेड कॉन्स्टेबल लखनसिंह गणेशसिंह ठाकूर यांनी समाजाची बांधिलकी जपत तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून येथील मेट्रो ब्लड बँक येथे रक्तदान करून सदरील गरजू रुग्णास रक्त उपलब्ध करून मदत केली आहे. लखनसिंह गणेशसिंह ठाकूर हे देशसेवा करत करत समाजाचं काहीतरी देणं लागतं. या भावनेने समाजसेवा करण्यासाठी ते सदैव पुढे असतात. लखन सिंह ठाकुर यांनी हे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपलीच आहे त्याच बरोबर महाराष्ट्र पोलीस दलाची मान ही अभिमानाने उंचावलेली आहे. त्यांचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. लखनसिंह ठाकूर यांनी वेळेवर गरजू रुग्णास रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिल्याबद्दल दयावान सरकार महाराष्ट्र राज्य च्या वतीने परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे यांनी लखन सिंह ठाकुर यांचा पुष्पहार घालून सत्कार करून आभार मानले आहे. सदरील रक्त उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलातील बॉम्बशोधक व नाशक, डॉग स्कॉड पथक पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथील कर्तव्यदक्ष हेड कॉन्स्टेबल अमोल शिरसकर साहेब, गोपाला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष खराटे, रयत मदत केंद्रचे संस्थापक बबन अण्णा मुळे, भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप वायवळ, मेट्रो ब्लड बँक कर्मचारी विठ्ठल शिंदे, दीपक करंडे, सचिन पवार, माधव गोचडे, अनिल सावंत, डॉ. बडे मॅडम, हाश्मी साहेब आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच दयावान सरकार मराठवाडा अध्यक्ष संजय भाई गायकवाड, परभणी जिल्हाध्यक्ष रघुवीर सिंग भाई टाक, महिला अध्यक्षा उषाताई पंचांगे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शेख अजहर, शांताताई कानडे, शहराध्यक्ष रमेश घनघाव, वकील संघाचे सल्लागार, ऍड. वैराळे, ऍड.महेंद्र काळे आदींचे मार्गदर्शन लाभले आहे. वेळेवर रक्त उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णाचे नातेवाईक यांनी दयावान सरकार महाराष्ट्र राज्याचे व रक्तदाते लखन सिंह ठाकुर त्यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here