प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
आज सिमला येथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एस.सी./एस.टी./ओ.बी.सी. व अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय समन्वयक मा.के.राजू सर यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष मा.राजेश लिलोठिया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या बैठकीस हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुकू यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.डॉ.सिध्दार्थ हत्तीअंबीरे, हिमाचल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष प्रतिभा सिंग व सर्व राज्याचे प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबैठकी दरम्यान मा.डॉ. सिध्दार्थ यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचा कार्य अहवाल सादर केला.

