प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
आम आदमी पक्ष महाराष्ट्र चे नवनियुक्त प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांचा चंद्रपूर आढावा बैठक दौरा येत्या रविवार 4 फेब्रुवारी सकाळी 11.30 वाजता बालाजी सभागृह गांधी चौक जवळ चंद्रपूर येथे नियोजित केलेला आहे.
या मध्ये चंद्रपुर चे जिल्हा आणि शहर समिती मधील सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित असणे अनिवार्य आहे.
त्याच बरोबर येणाऱ्या काळात पार्टीची दिशा काय असेल यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येईल.
★ काही महत्वाच्या सूचना
१. आढावा बैठक यशस्वी करण्याची आणि सगळे एका ठिकाणी वेळत पोहोचण्याची ज़बाबदारी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता ची आहे.
२. नवीन पक्ष प्रवेश ही बैठकी दरम्यान करता येतील.
३. सर्व जिल्हा, शहर, तालुका, आघाडी, पालिका, पंचायत, ग्राम, वॉड आणि बूथ समिति चे आजी माजी कार्यकर्ते उपस्थीत राहणे अनिवार्य आहे.
४. पक्षाचे संघटन, विचार, धोरण आणि पुढील दिशा विषयी कोणतेही प्रश्न आपण विचारू शकता आणि संघटन बांधणी वर पूर्ण माहिती समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे.
अधिक माहिती किंवा विशेष सूचने साठी आपल्या जिल्हा/शहर अध्यक्ष सचिव यांच्याशी सम्पर्क साधावा..

