गंगाखेड प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
गंगाखेड शहरातील ममता काॅलनी येथील फक्रुद्दीन अली अहेमद ऊर्दू शाळा गंगाखेड येथे आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत स्नेहसंमेलन चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या स्नेहसंमेलनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदला होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमध्ये विजय झालेल्या खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले. या उद्घाटक व बक्षीस वितरणाचा कार्यक्रमास रत्नाकरराव गुट्टे काका मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे तसेच पत्रकार अन्व लिंबेकर, माजी,नगर सेवक नगमा चाची, मा.नगर सेवक, फेरोज पटेल, मुजीब भाई, शहर अध्यक्ष खालेद भाई, जावेद खान, गुत्तेदार शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

