prabodhini news logo
Home चंद्रपूर विरव्हा येथे मतदार जागृती सप्ताह साजरा

विरव्हा येथे मतदार जागृती सप्ताह साजरा

0
98

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथे दिनांक 01.02. 2024 रोजी तहसिल कार्यालय सिंदेवाही आणि सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत मतदार जागृती सप्ताह व मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत राज्यामध्ये मतदार जागृती सप्ताह राबविण्यात येतो. त्यानिमित्ताने मौजा विरव्हा येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये मतदार जनजागृती व विकसित भारताकरिता युवाशक्ती या संकल्पनेवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रामदास शेंडे हे होते. याप्रसंगी प्रविण गावंडे नायब तहसीलदार, युवराज मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी लेमदेव नागलवाडे, मंडळ अधिकारी अंबादास गेडाम, सरपंच विरव्हा छाया चौधरी, रिझवान शेख, कैलास मोहूर्ले, बहुसंख्येने विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here