रोहिणी पवार
उप संपादिका
प्रबोधिनी न्युज
अहमदनगर – छगन भुजबळ समर्थकांकडून आयोजित ओबीसी मेळाव्यात जाती छोडो देश जोडो अशा आशयाचा फलक दाखवत असताना छगन भुजबळांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकावर दोनशे च्या वर छगन भुजबळ समर्थकांकडून प्राणघातक हल्ला करून मारहाण करण्यात आली. गांधी वादी मार्गाने फलक दाखवत जनजागृती करणाऱ्या तरूणावर पोलीस कारवाई झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय समाजवादी पार्टी ने उत्कर्ष गीते यांना पोलीस प्रोटेक्शन देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात जाणुन बुजुन ओबीसी मराठा वाद पेटवून देण्यात आला असून शिंदे सरकार चे सर्वेक्षण कर्मचारी घरोघरी जाऊन जात विचारत असल्याने अनेक मराठी कलाकारांनी देखील आक्षेप नोंदवला असुन भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली जाती अंताची लढाई पुन्हा एकदा सुरु झालेली आहे. राष्ट्रीय समाजवादी पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष मनोज काळसेकर यांनी आज चैत्य भूमीवरून सर्व भारतीयांना जात नाकारण्याचे आवाहन केले आहे.

