आकाश नरताम
वर्धा जिल्हा प्रतिनिधि
वर्धा-नागपूर महामार्गावर साडे आठ वाजताच्या दरम्यान महाबळा जवळ घडली अरुण चिरकूटराव नागोसे वय 48 रा. सालइ पेवट संजय लक्ष्मणराव वाघाडे वय 49 रा. सालइ पेवटअसे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे
मिळालेल्या माहिती नुसार अरुण नागोसे व लक्ष्मण वाघाडे ये MH32I8602 या क्रमांकाच्या दुचाकीने सालइ पेवट वरून कामानिमित्त दहेगाव येथे जात होते दरम्यान दुचाकी वरून नियंत्रण सुटल्याने ते MH32M9972 या क्रमांकाच्या दुचाकीवर मागून धडकले यात धडक देणारे दुचाकी चालक अरुण नागोसे व लक्ष्मण वाघडे हे गंभीर जखमी झाले तसेच घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ता रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांना मिळताच त्यांनी जखमीला आपल्या रुग्णवाहिकेत ग्रामीण रुग्णालय सेलू येथे दाखल केले असता डॉक्टरांनी संजय वाघाडे याला हाता पायाला घरसटले असल्या मुळे उपचार करून सुट्टी दिली तर अरुण नागोसे यालां डोक्याला जबर मार असल्या मुळे वर्धा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारा साठी पाठविले ज्या दुचाकीलां धडक दिली तो दुचाकी चालक थोडक्यात बचावला या प्रकरणी पोलिसांत कोणतेही नोंद झालेली नाही.

