नाट्यरसिकांना दर्जेदार ३८ नाटकांची मेजवानी
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेची अंतिम फेरी दि.२० फेब्रुवारी ते १२ मार्च २०२४ दरम्यान चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्यगृहात सम्पन्न होत आहे. या अंतिम स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपूरकर नाटय रसिकांना दर्जेदार ३८ नाटकांची मेजवानी मिळणार आहे.
या आनंद पर्वणीत दि. २० फेब्रुवारी रोजी उद्घाटन सत्रानंतर सायंकाळी ७.३० वा अ भा मराठी नाटय परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे राजदंश, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वा. ग्रामीण समाज प्रबोधिनी मुंबई या संस्थेचे ज्याचा त्याचा प्रश्न, दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वा. बेस्ट कला व क्रीडा मंडळ मुंबई या संस्थेचे मॅकबेथ, सायंकाळी ७.३० वाजता कोराडी थर्मल पॉवर स्टेशन स्टाफ असोसिएशन कोराडी नागपूर या संस्थेचे गावभाग नातं मुळाशी, दि. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वा. आंबेडकरवादी मंच नांदेड या संस्थेचे गटार, दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वा. जाणीव चॅरिटेबल फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचे सारी रात्र, सायंकाळी ७.३० वा. ललित कला व नाट्यतंत्र शिक्षण महाविद्यालय शांतिनिकेतन सांगली या संस्थेचे इथर, दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वा अथ व इति नाट्यकला प्रतिष्ठान अमरावती या संस्थेचे पूर्णविराम, सायंकाळी ७.३० वा मध्यप्रदेश मराठी अकादमी इंदोर या संस्थेचे दृष्टी, दि.२७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वा.नवोदिता चंद्रपूर या संस्थेचे जेंडर अँन आयडेंटिटी, सायंकाळी ७.३० वा. मंगल थिएटर्स पुणे या संस्थेचे लगीन, दि.२८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वा. मांगिरीश युथ क्लब फोंब्रा गोवा या संस्थेचे फादर, सायं. ७.३० वा. सिध्द नागार्जुना मेडीकल असोसिएशन नांदेड या संस्थेचे नेकी, दि.२९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वा. मातोश्री गुंजाई फाऊंडेशन कल्याण या संस्थेचे हायब्रीड, सायं. ७.३० वा. स्वराज फाऊंडेशन, मुंबई या संस्थेचे द फिअर फॅक्टर हे नाटक सादर होईल.
१ मार्च रोजी सकाळी ११.३० वा. मॉडर्न महाविद्यालय, पुणे या संस्थेचे द सिक्रेट ऑफ लाईफ, सायं. ७.३० वा. नाटय भारती इंदौर या संस्थेचे रा+धा=, २ मार्च रोजी सकाळी ११.३० वा. नाटयरंग बहु. संस्था जळगाव या संस्थेचे हम दो No, सायं. ७.३० वा. महात्मा गांधी विद्यामंदीर, नाशिक या संस्थेचे चोरीला गेलाय, ३ मार्च रोजी सकाळी ११.३० वा सप्तरंग थिएटर्स अहमदनगर या संस्थेचे अश्वदा, सायं. ७.३० वा. गंधर्व बहु. संस्था, अमरावती या संस्थेचे सती, ४ मार्च रोजी सकाळी ११.३० वा. रंगकर्मी प्रतिष्ठान, अहमदनगर या संस्थेचे नाना थोडं थांबा ना ! , सायं. ७.३० वा. सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर या संस्थेचे दि फिअर फॅक्टर, ५ मार्च रोजी सकाळी ११.३० वा. लोकरंगभूमी या संस्थेचे ओऍसिस, सायं. ७.३० वा. संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ संभाजीनगर या संस्थेचे नास्ति तृष्णा समो व्याधिः, ६ मार्च रोजी सकाळी ११.३० वा. सरकार बहु. संस्था अमरावती या संस्थेचे खेळीमेळी, सायं. ७.३० वा. स.न.वि.वि. प्रतिष्ठान भाईदर या संस्थेचे द रेन इन द डार्क, ७ मार्च रोजी सकाळी ११.३० वा. शाहू कला अकादमी सातारा या संस्थेचे नियतीच्या बैलाला, सायं. ७.३० वा. श्रीरंग रत्नागिरी या संस्थेचे तथास्तु, ८ मार्च रोजी ११.३० वा. मराठा समाज सेवा संघ ठाणे या संस्थेचे बारस, सायं. ७.३० वा. सृजन प्रतिष्ठान वाशिंद या संस्थेचे अ ते ज्ञ, ९ मार्च रोजी सकाळी ११.३० वा. पोलिस कल्याण केंद्र, मुंबई या संस्थेचे एकेक पान गळावया, सायं. ७.३० वा. सहप्रमुख कामगार अधिकारी, बृहमुंबई मनपा जेंडर अँन आयडेंटिटी, दि. १०मार्च रोजी सकाळी ११.३० वा. संक्रमण पुणे या संस्थेचे छिन्नमस्ता, सायं. ७.३० वा. श्री विध्नहर्ता प्रतिष्ठान मुंबई या संस्थेचे चांदतारा, ११ मार्च रोजी सकाळी ११.३० वा. झपुर्झा नाटय मंदिर सोलापूर या संस्थेचे समांतर, सायं. ७.३० वा. शोध क्रिडा सांस्कृतीक सामाजिक संस्था, कुर्डुवाडी या संस्थेचे दुसरा अंक, दि. १२ मार्च रोजी सायं. ७.३० वा. श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाटयासमाज गोवा या संस्थेचे यत् न कथ्यते ही नाटके अंतिम फेरीत सादर होणार आहेत.
या स्पर्धेसाठी फक्त १५ रु व १० रु चे तिकीट आकारण्यात आले आहे.या नाटय पर्वणीचा आनंद चंद्रपूरकर नाटय रसिकांनी लुटावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे यांनी केले आहे.

