रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज
ब्रम्हपुरी तालुक्यातील परसोडी (जाणी) येथील अमर क्रिकेट क्लब यांच्या सौजन्याने रात्रकालीन हॉप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे सर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष राजेश पारधी, माजी नगरसेवक जगदीश आमले, प्रधान गुरूजी, कंत्राटदार प्रेमलाल धोटे, पत्रकार अमर गाडगे, पोलिस पाटील आचल चहांदे, कंत्राटदार इंजि. चेतन चंद्रगिरीवार यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके व माजी जिल्हा परिषद परिषद सदस्य डॉ राजेश कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ते म्हणाले की, क्रिकेट खेळण्याचे अनेक फायदे असुन हे सहनशक्ती, तग धरण्याची क्षमता, शारीरिक तंदुरुस्ती आणि हाताने डोळ्यांचे समन्वय सुधारू शकते . क्रिकेटमध्ये स्प्रिंटिंग आणि थ्रोइंगचे लहान स्फोट देखील समाविष्ट आहेत जे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी चांगले आहे. सांघिक कौशल्ये विकसित करण्यासाठी हा खेळ चांगला आहे असेही यावेळी ते म्हणाले.
या स्पर्धेमध्ये हजारों रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. अमर क्रिकेट क्लब परसोडी यांच्या सौजन्याने आयोजित भव्य हॉप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तालुक्यातील अनेक गावातील क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला आहे.

