prabodhini news logo
Home चंद्रपूर मुरमाडी येथे तीन दिवसीय महोत्सवाचे थाटात उद्घाटन

मुरमाडी येथे तीन दिवसीय महोत्सवाचे थाटात उद्घाटन

0
157

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सिंदेवाही तालुक्यातील मुरमाडी गावात शिवजयंती चे औचित्य साधून संपूर्ण गावासाठी आयोजित तीन दिवसीय मुरमाडी क्रीड़ा व सांस्कृतिक महोत्सवाचे संपूर्ण गावकऱ्यांच्या समक्ष थाटात उद्घाटन पार पडले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुरमाडी गावच्या सरपंच रुपाली रत्नावार तर अध्यक्ष म्हणून सिंदेवाही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. रमाकांत लोधे उपस्थित होते.
उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी गावातील मुली आणि महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात महिलांचे फॅशन शो, संगीत खुर्ची, कबड्डी, धावणे, तीन पायाची दौड़ सारख्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. शाळेच्या विकासासाठी सदोदित मदत आणि सहकार्य करणारे अशोक दांडेकर यांना मुरमाडी भूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

दैनंदिन जीवनातील व्यस्ततेतून वेळ काढून गावातील कामगार महिलांनी स्वत साठी वेळ काढून सर्वच स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्वासाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात गावातील आबालवृद्धांनी केलेले सादरीकरण बघून सर्व मंत्रमुग्ध झाले.
तीन दिवसीय क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाने गावात आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे़. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश ढोक आणि सर्व सदस्य, ग्राम पंचायत चे सर्व पदाधिकारी,गणेश मंडळाचे सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक मेश्राम, सहायक शिक्षक प्रकाश बन्सोड, सोनाली ज्ञानवल, शिक्षक प्रेमी चंदू भंडारे परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here