prabodhini news logo
Home चंद्रपूर 28 फेब्रुवारी रोजी आयटीआय मधील निरुपयोगी साहित्यांचा लिलाव

28 फेब्रुवारी रोजी आयटीआय मधील निरुपयोगी साहित्यांचा लिलाव

0
91

प्रणित तोडे
जिल्हा प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज,चंद्रपुर

चंद्रपूर, दि. 20: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागभिड येथील विविध व्यवसायातील निरुपयोगी, कालबाह्य झालेली निर्लेखित संयत्रे, साहित्य, उपकरणे आहे त्याच अवस्थेत विक्री करावयाचे आहे. याकरीता दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता लिलाव आयोजित करण्यात आला आहे.
ईच्छुक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,एम.आय.डी.सी.परीसर,नागभिड येथे अधिकृत लेख्यासह उपस्थित राहावे. असे नागभिड,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर.एम. डांगे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here