कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील मुरमाडी गावात दिनांक 19,20, 21 फेब्रुवारी रोजी सुरू असलेल्या खुल्या तीन दिवसीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवात आजच्या दुसर्या दिवशी महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून महिला सक्षमीकरण प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात स्त्रियांच्या आरोग्य विषयक समस्या बाबत डॉ. नम्रता शेंडे सिंदेवाही यांनी मार्गदर्शन केले.
गाव विकासात महिलांचे योगदान बाबत विद्या गेडाम, विधि निदेशिका पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल यांनी मार्गदर्शन केले.
महिलाना कायदेविषयक माहिती आणि घरगुती हिंसाचार बाबत महिलांचे संरक्षण साठी कायद्याची माहिती अॅड. सुरेखा मेश्राम यांनी दिली.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रुपाली रत्नावार सरपंच मुरमाडी होत्या. कार्यक्रमाचे संचालन सोनाली ज्ञानवल मॅडम यांनी केले.
मुरमाडी महोत्सव च्या यशस्वितेसाठी शाळेचे शिक्षक प्रकाश बन्सोड मुख्याध्यापक रमेश मेश्राम, शिक्षक प्रेमी चंदू भेंडारे शाळा व्य. समितीचे अध्यक्ष नितेश ढोक आणि सर्व सदस्य अविरत प्रयत्न करत आहेत.

