
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही येथे दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोज शनिवारला बंडुजी टेपाले संचालक जैन कलार समाज जिल्हा कार्यकारणी चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली, व प्राध्यापक सुधाकर वारजुरकर सल्लागार जैन कलार समाज सिंदेवाही यांचे मार्गदर्शनात तालुक्यातील जैन कलार समाज बांधवांची सभा नरेंद्र डेंगे सिंदेवाही यांचे घरी घेण्यात आली .यात पुढील तीन वर्षाकरिता जैन कलार समाज तालुका सिंदेवाही करिता कार्यकारणी निवड करण्यात आली.
सल्लागार म्हणून प्रा.सुधाकर वारजुरकर सिंदेवाही, अध्यक्ष म्हणून बंडूजी टेपाले सिंदेवाही, सरचिटणीस म्हणुन मिलिंदराव चिमूरकर सिंदेवाही, कोषाध्यक्ष म्हणुन दिलीपराव डोर्लीकर सिंदेवाही, कार्याध्यक्ष म्हणुन दत्तात्रय कवठे पेटगांव, उपाध्यक्ष म्हणुन अमृत डेंगे पेटगांव, उपाध्यक्ष म्हणुन प्रियाताई गुरु गडबोरी, उपाध्यक्ष म्हणुन राम कवठे चारगाव, सहसचिव म्हणुन भाग्यश्री डोर्लीकर सिंदेवाही, सहसचिव म्हणुन यमु कावळे पेटगांव, सदस्य म्हणुन प्रेमकुमार डेंगे पेडगाव, विजय मुरकुटे भेंडाळा, जगन्नाथ कवठे वासेरा, दिनेश खानोरकर नवरगाव, प्रकाश समर्थ सिंदेवाही, प्रभाकर वारजूकर कच्चेपार, शुभांगी रहाटे सिंदेवाही, पांडुरंग दहीकर नांदगाव, नीता कावळे पेडगाव, शालिनी वारजुरकर सिंदेवाही, डॉ. प्रकाश समर्थ पेडगाव, चारुशीला रणदिवे, प्रफुल रहाटे चारगाव व प्रसिद्धी प्रमुख म्हणून नरेंद्र डेंगे सिंदेवाही यांची निवड करण्यात आली.
अशा प्रकारे सिंदेवाही तालुक्याची जैन कलार समाजाची कार्यकारणी निवड करण्यात आली. अध्यक्षीय भाषणातून बंडू टेपाले व प्रा.वारजूरकर यांनी मार्गदर्शन केले. सभेचे प्रास्ताविक दिलीप डोर्लीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर तिडके यांनी केले संचालन नरेंद्र डेंगे यांनी केले. सभेच्या यशस्वी करिता मिलिंदराव चिमूरकर, प्रीती चिमूरकर, नंदकिशोर डोरलीकर, भाग्यश्री डोर्लीकर, नरेंद्र डेंगे, माया डेंगे, बंडूजी टेपाले, वैशाली टेपाले यांनी विशेष प्रयत्न केले.














