उमेश एखंडे
बुलडाणा प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली सिंदखेड राजा तालुक्यातील सेलू येथून डिजे च्या निदानात छत्रपती शिवाजी महाराज यांचा रथ मोटारसायकल रॅली काढण्यात आली सेलू येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करुन भोसां, धांदरवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन, डावरगाव येते प्रतिमेचे पूजन व सरपंच संदीप भाऊ देशमुख यांच्या मिञ मंडळ वतीनं नाष्टा ठेवण्यात आला होता अचली येथे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून नसिराबाद येथे फटाके वाजवून रॅली माळ सावरगाव येथे सरपंच निऊर्ती कठोरे यांच्या वतीने रॅली तील शिवभक्तांचा स्वागत केले सिंदखेड राजा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती घेण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज नगर येथून राजवाड्या पर्यंत भव्य मिरवणूक व महाराजांचा पाळणा ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या राजवाड्यात जिजाऊ यांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला रॅलीत माजी आमदार शशिकांत खेडेकर, नगरध्यक्ष सतीश तायडे, नगरसेवक गौतम खरात, राजेंद्र अंभोरे, अमरभाऊ जाधव, अमोल राठोड, मनोज भाऊ घाटोळकर, यांनी सहभाग घेत सर्व शिवभक्त यांनी दर्शन घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी शिवजन्मोतसव समितीचे अध्यक्ष डॉ बालासाहेब पाटील, दीपक शेळके, सरपंच संदीपभाऊ देशमुख, सरपंच, निउर्ती कठोरे, शीवभाऊ पुरंदरे, गोविन्द टेके, बाळासाहेब शेळके, दीपक किंगरे, विनोद सोळुंके, चंदू साबळे, निलेश देवरे, अंकुश कठोरे, यासह अनेक शिवभक्त सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे आयोजन अखील भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजे अशोकराव जाधव यांनी केले होते

