prabodhini news logo
Home अहेरी राजाराम येथे समक्का-सारक्का जत्रा मोठ्या उत्साहात साजरा

राजाराम येथे समक्का-सारक्का जत्रा मोठ्या उत्साहात साजरा

0
129

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी पूजाअर्चा करत घेतले दर्शन

अहेरी:-तालुक्यातील राजाराम खांदला येथील समक्का-सारक्का जत्रेला माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी उपस्थिती दर्शवून आशीर्वाद घेतले.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राजाराम (खा) येथे समक्का-सारक्का जत्रेचे आयोजन करण्यात आले.२१ फेब्रुवारी पासून याठिकाणी विधिवत पूजा सुरू असून २३ फेब्रुवारी पर्यंत ही जत्रा सुरू राहणार आहे.समक्का-सारक्का मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली असून आज गुरुवार २२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी मंदिरात भेट देत पूजाअर्चा करत मातेचे आशीर्वाद घेतले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,सरपंच मंगला आत्राम,उप सरपंच रोशन कंबगोनिवार,सदस्य विनायक आलाम,सपना मारकवार,तिरुपती मोतकुरवार,संतोष आत्राम,शंकर कोडापे,मुख्याध्यापक एम व्ही बासनवार आदी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here