प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
संक्रांत नि काही मैत्रिणी…. अनोखा उपक्रम राबविण्यात आला जसे सावित्री बाई फुले यांनी मुलीच्या शिक्षणासाठी शेणाचे गोळे आंगावर कपड्यावर घेतले तरी मुलींसाठी काहीतरी वेगळ करायचे पण त्यांनी श्रीयांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडुन दिले समाजाची पर्वा नकरता मुलींना शिक्षण दिले त्यांना स्वलंबी बनविले शिक्षणाचा मुलभुत अधिकार दिला हिच प्रेरणा घेऊन असेन काही करांजा लाड येथे संक्रांत निमित्त कारंजा लाड येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ शारदा अतुल भुयार यांनी पारंपरिक रूढी परंपरा न मानता सौ शारदा भुयार यांनी आपल्या विधवा मैत्रिणी ना घरी हळदीकुंकू समारंभ बोलावले परंतु अनेक मैत्रिणी लोकं काय म्हणतील म्हणून हळदीकुंकू करिता आल्या नाही तर शारदा भुयार यांनी विधवा मैत्रिणी ना त्यांच्या घरी जाऊन हळदीकुंकू वान तिळगुळ देऊन प्रेमाची भेट दिली नि कुंकु हे लग्ना पुर्वी लावत होतो तर नवरा गेला कुंकु गेले म्हणने योग्य नाही.तर प्रत्येक विधवा स्त्री ने कुंकु लावले पाहिजे.कुकवा मुळे एक ताकत नि शक्ती मिळते.हे प्रत्येकीला पटवुन दिले नवीन मार्ग महिलांना पटवुन दिला प्रत्येक घरी आनंद देऊन संक्रांत निमित्त जगण्याची प्रेरणा ऊर्जा दिली. प्रत्येकीला आनंद मिळाला पण डोळ्यांतील अश्रू घळाघळा ओसंडून वाहत होते प्रत्येक मैत्रिण म्हणत होती.
ताई तुमच्या सारख्या हिम्मत देत नाही घरी येऊन कुंकु लावने दुरच…. ताई तुम्हाला लोकं बोलतील माझा विचार करु नका .तुम्हाला प्रेमाचे दोन क्षण देते तो आनंद लाखों, करोडो रुपये पेक्षा जास्त आहे यातच मला समाधान आहे असे सौ शारदा भुयार यांनी व्यक्त केले समाज काय म्हणेल याचा विचार न करता हा अनोखा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पाडला.

