प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
नेपाळ काठमांडू येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा, पुस्तक प्रकाशन आणि बहारदार कविसंमेलन व संत सेवालाल महाराज जयंती उत्सव सोहळा हर्ष उल्हासात दिनांक :१४/२/२०२४ रोजी साजरा, करण्यात आला.
बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद च्या वतीने हा कार्यक्रम हाॅटेल हाॅलीडे रेजींसी रारा कान्फरन्स हाॅल थामेल काठमांडू, नेपाळ येथे घेण्यात आला.कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रा.डाॅ.संघर्ष बळीराम सावळे, स्टुडंट्स ॲम्बेसेडर ऑफ स्कॉटलंड हे होते.
या दैदिप्यमान सोहळ्याला अध्यक्ष मा.डॉ.प्रा.अशोक पवार अर्थशास्त्र विभाग औरंगाबाद, प्रमुख पाहुणे म्हणून मा.माजी न्यायमूर्ती नामदेवजी चव्हाण पुणे,मा.राजाराम जाधव,मा.विज्यकुमार कस्तुरे, चिखली बुलढाणा,मा.शोभा वेले, नागपूर जेष्ठ कवयित्री, समाजसेविका.मा.डाॅ.प्रा.संघर्ष बळिराम सावळे, स्टुडंट्स ॲम्बेसेडर ऑफ स्कॉटलंड,मा.बबन महामुनी,मा.खरात सर प्रामुख्याने उपस्थित होते.
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.शेळके सरआणि सोनल मॅडम यांनी केले.आभारप्रदर्शन मा.आशा पारधे यांनी केले.कार्यक्रमाला चाळीस मान्यवर उपस्थित होते.
नेपाळचा प्रवास आल्हाददायक आणि स्मरणात राहील असाच होता.
कार्यक्रमाला.बुलडाना,शेगाव, मलकापूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील मान्यवर उपस्थित होते

