बाबुराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
देश व राज्य पातळीवर झालेल्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आंबेडकरवादी मिशनचे 25 विद्यार्थी विविध पदावर निवड झाली आहे.
त्यात प्रामुख्याने अशोक बारसागडे आयआयटी खरगपूर येथून एम टेक शिक्षण पूर्ण केलेले चंद्रपूर जिल्ह्यातील अत्यंत गरीब घरचा विद्यार्थी नाबार्डच्या ग्रूप Aअधिकारी पदी त्यांची निवड झाली आहे. यूपीएससीच्या आतापर्यंत सहा वेळा त्यांनी मुख्य परीक्षा दिली असून दोन वेळा त्यांनी मुलाखती दिल्या आहेत. आपली पुढील वाटचाल ही आयएएस होण्या चे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करून गेल्या पाच वर्षापासून आंबेडकरवादी मिशन ने दिल्ली आणि नांदेड येथे खंबीर सहकार्य केले त्यामुळे आपणाला ही यश प्राप्त करता आले असे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
आनंद सदावर्ते हे वसमत येथील रहिवासी असून इंजीनियरिंग मध्ये त्यांनी शिक्षण केले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अग्रिकल्चर रिसर्च नवी दिल्ली या देशभरातील नामांकित संस्थेमध्ये प्रशासकीय अधिकारी वर्ग एक पदी त्यांची निवड झाली आहे. आंबेडकरवादी मिशन दिल्ली येथे एक वर्ष त्यांस निशुल्क सहकार्य करण्यात आले होते.
तेजस्विनी विलास भद्रे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गात पीएचडीसाठी प्रवेश पूर्व परीक्षेमध्ये MCAER महाराष्ट्रामध्ये एससी प्रवर्गात गु दुसरा क्रमांक व देशपातळीवर ICAR गुना अनुक्रमे तेरावा क्रमांक पटकावला आहे. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये ऍग्रो इकॉनॉमिक्स या विषयांमध्ये करणार आहेत.
एमपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत अजय गलावट यांची SGST इन्स्पेक्टर पदी निवड झाली आहे.
कंधार येथील सुजित कदम यांची निवड मेलबर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी झाली .
सुधाकर गायकवाड हा सन्मुखवाडी तांडा ता मुखेड जि नांदेड, येथील रहिवासी असून , त्याचेआई वडील भाऊ ऊस तोड कामगार, त्याची सद्य दोन पदावर निवड झाली आहे, वरिष्ठ साहाय्यक लेखा म्हणुन सातारा जिल्हा परिषद (class3), आणि आणि कनिष्ठ लेखाधिकरी (class2) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, या दोन ठिकानी सुधाकर राठोड यांची निवड झाली आहे. सातत्याने तीन वर्ष सुधाकर आंबेडकरवादी मिशन नांदेड येथे मिशन केंद्रात होते.
रवींद्र सोनवणे हा अत्यंत गरीब घरचा विद्यार्थी आई वडील किरकोळ भाजीपाला विक्रेते होते. आंबेडकरवादी मिशन ने सलग सात वर्षे या विद्यार्थ्याला निशुल्क सहकार्य केले . रवींद्र सोनवणे ची वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
प्रविण रमेश निखाते याची तिन पदावर निवड झाली आहे फार्मासिस्ट अधिकार, तलाठी,मंत्रालयीन लिपिक .
दैवशाला गंगाधरराव डोंगरे, तेजस्विनी नितीन बचुटे यांची पिढीसाठी निवड झाली असून त्यांना पार्टीतर्फे फिलोशीप प्रदान करण्यात आली आहे.
प्रबुद्ध रमेश चित्ते ,भारतीय राठोड, महेश हंबर्डे, सचिन माऊलीकर , तुषार सुरवाडे यांनी नेट सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
तलाठी ,क्लार्क ,वनरक्षक, पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस पाटील आधी पदावर 25 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
राज्यभरात जी सरकारी नोकरीची भरती प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये 100 पेक्षा जास्त विद्यार्थी अंतिम टप्प्यांमध्ये पोहोचले असून त्यांची लवकरच अंतिम निवड होईल असे याप्रसंगी दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी स्पष्ट केले.
सध्या आंबेडकरवादी मिशन मध्ये दिल्ली येथील नामवंत यूपीएससी क्लासेस नेक्स्ट आयएएस चे मार्गदर्शन महाराष्ट्रामध्ये केवळ नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. दोन लाख रुपये फीस असलेले हे क्लासेस महाराष्ट्रातील गरीब विद्यार्थ्यांच्या दिल्लीला जाऊन क्लासेस करणे हे आवाक्या बाहेर आहेत म्हणून नांदेड येथे विद्यार्थ्यांना अत्यंतिक नाममात्र दरामध्ये हि सुविधा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी उपलब्ध करुन देण्यात आली आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी केले.

