प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
श्री जीवदान देवी संस्थान, विरार, जय आदिवासी युवा शक्ति आणि सर्वदा प्रतिष्ठान ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आज नागझरी, बोईसर येथे २५१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला.
आदिवासी आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांसाठी सामूहिक विवाह सोहळा लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर, कामगार नेते श्री राजीव पाटील, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा आमदार क्षितीज ठाकूर आणि बोईसर विधानसभेेचे कार्यक्षम आमदार राजेश पाटील ह्यांनी जीवदानी देवी संस्थान, आदिवासी युवा शक्ति आणि सर्वदा प्रतिष्ठान ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिन करण्यात आले होते. नवविवाहित जोडप्यांना मंगळसूत्र पासून गृहोपयोगी वस्तू सुद्धा देण्यात आले. २५१ जोडपी आणि त्यांचे कुटुंब सदस्य असे हजारोंच्या संख्येने लोक सोहळ्यास उपस्थित होते. आयोजकांकडून जेवणाची सुद्धा उत्तम सोय करण्यात आली होती. नागझरी गावाला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते, एवढा लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि लोकांमध्येसुद्धा उत्साहाचे वातावरण होते. संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

