prabodhini news logo
Home ठळक बातम्या पशुविस्तार उपक्रमात महिलांचा सहभाग महत्वाचा – सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड

पशुविस्तार उपक्रमात महिलांचा सहभाग महत्वाचा – सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड

0
114

बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज

शेळी संगोपन अल्पभूधारक आणि भूमीहीन ग्रामीण कुटुंबाच्या उपजिविकेचे एक प्रमुख साधन आहे. अशा कुटुंबातील शेळीसंगोपनाची बहुतांश जबाबदारी महिलाकडेच असते. त्यामुळे विस्तार उपक्रमात महिलांची सहभागिता वाढविल्यास शास्त्रीय पद्धतीचा प्रसार आणि अवलंब निश्चित वाढेल असे प्रतिपादन मा. सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी केले. बीड जिल्ह्यातील पशुसखीसाठी उदगीर पशुवैद्यक महाविद्यालयात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. माफसू, नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘महाराष्ट्रातील शेळी व कुक्कुटपालन करणा-या महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी पशुसखी व प्रशिक्षक महिलांचा क्षमता विकास’ या प्रकल्पाअंतर्गत दि.२६ फेब्रुवारी ते ०६ मार्च २०२४ दरम्यान पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे पशुसखींसाठी ‘शेळीपालन’ या विषयावर दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमास परभणी येथून प्रकल्प समन्वयक डॉ. धनंजय देशमुख यांनी पशुसखीना विद्यापीठ राबवित असलेल्या प्रकल्पाबाबत दूरस्थ प्रणालीद्वारे अवगत केले. प्रकल्प सह-समन्वयक तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ. नरेन्द्र खोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रकल्प व प्रशिक्षणाबाबत उपस्थित पशुसखींना अवगत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. शरद आव्हाड, प्रशिक्षण सह-समन्वयक यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. राम कुलकर्णी यांनी केले. यावेळी प्राध्यापक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here