चंद्रपूर – EVM मशीन व्दारे निवडणूक पध्दतीवर बॅन आणून निवडणूक बॅलेट पेपर वरती घेण्यात याव्या या मागणीसाठी आज बुधवारला समता सैनिक दल आणि भारतीय बौध्द महासभा जिल्हा चंद्रपूरच्या पुढाकारातून सामाजिक, धार्मिक ,शैक्षणिक, वकील व राजकीय पक्षांच्या वतीने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक लेखी निवेदन सादर करण्यात आले.या वेळी चंद्रपूर जिल्हा समता सैनिक दलच्या ॲड.पुनम वाघमारे -उमरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

