उषा नाईक
विदर्भ संपादक
प्रबोधिनी न्युज
नागपुर – मागील अनेक दिवसापासून आम आदमी पार्टी नागपूर शहर युवा आघाडी तर्फे डेप्टी सिग्नल परिसरातील एम एस सी डी सी एम इलेक्ट्रिक बोर्ड च्या कार्यालयावर मोर्चा काढला.
अनेक महिन्यांपासून नागरिकांना एवरेज बिल देऊन त्यांची आर्थिक नुकसान देऊन. त्यांना योग्य बिल न देता लोकांना मानसिक व आर्थिक समस्येतून जावं लागत आहे. आम आदमी पार्टी युवा आघाडी युवा उपाध्यक्ष तेजराम साहू आणि नफीस शेख यांच्या नेतृत्वात MSEDCL कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अनेक दिवसापासून नागरिकांच्या तक्रारी व तेथील गरीब लोकांच्या समस्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना लोकं सांगत आहेत. त्याचा आक्रोश म्हणून एव्हरेज बिलच्या विरोधात मोर्चा काढण्यात. सोनू फटिंग,शुभम मोरे,प्रतीक बावणकर, मोहन मांगर, संगीता बाथो,लक्ष्मी खालगोने, नरेश महाजन, प्रदीप पौनीकर, हेमंत पांडे, कैलास कावला, पंकज मेश्राम,अमेय नरनावरे, शैलेश गजभिये पदाधिकारी
व आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीचे आघाडीचे पदाधिकारी सोबत शेकडो नागरिक उपस्थित होते.

