सिंदेवाही तहसिल कार्यालय येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची सभा

0
104

दिव्यांग मतदारांना घरातून मतदानाची संधी

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही-

सिंदेवाही तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची तहसिल कार्यालय सिंदेवाही येथे दि. २६.०२.२०२४ ला सभा आयोजित करण्यात आली. निवडणूकपूर्व कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने ही सभा आयोजित करण्यात आली. येत्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच 80 पेक्षा जास्त वय असणारे आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असणाऱ्या मतदारांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याबाबतच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल तहसीलदार संदीप पानमंद यांनी सभेमध्ये माहिती दिली. यासाठी संबंधित मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत 12 ड हा अर्ज भरावा लागणार आहे. आणि अर्जामध्ये मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार की घरून मतदान करणार याबाबत विकल्प द्यावा लागणार आहे आणि त्यावर जिल्हा निवडणूक अधिकारीअंतिम निर्णय घेणार आहेत. घरातून मतदान करताना पारदर्शकता राहावी यासाठी निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष प्रतिनिधी हे उपस्थित राहणार आहेत. ज्या मतदारांना मतदार केंद्रावर जाऊन मतदान करता येत नाही त्यांचे मतदान वाया जाऊ नये म्हणून ही सुविधा निवडणूक आयोगाने सुरु केली आहे असे सांगितले. तसेच ज्यांची वयाची 18 वर्ष पूर्ण झाली आहे परंतु अद्याप मतदार नोंदणी न केलेल्या विद्यार्थी आणि तरुणांनी मतदार नोंदणी करावे असे आवाहन संदीप पानमंद यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार हेमंत तेलंग, मंगेश तुमराम, शरद लोखंडे, प्रविण गावंडे, युवराज मेश्राम आणि सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here