नवरगांव येथे शिवराय ते भीमराय समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

0
28

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व सौदंयीकरणाचा लोकार्पण सोहळा

सुप्रसिद्ध गायक,राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांचा बहुजनवादी महापुरुषाच्या विचारांवर प्रबोधनात्मक जलसा

कार्यक्रमाचे उदघाटक मा. ना. विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते महाराष्ट यांची उपस्थिती

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

शहर कांग्रेस कमिटी तथा बौध्द नगर स्मारक समिती नवरगांव द्वारा आयोजित भारतीय संविधानाचे शिल्पकार,भारतरत्न, परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवरगांव येथे पूर्णाकृती पुतळा व सौदंयीकरणाचा लोकार्पण सोहळा निमित्य शिवराय ते भीमराय या बहुजनवादी महापुरुषांच्या विचारावर समाज प्रबोधनाचा भव्य कार्यक्रम दि. ३ मार्च २०२४ रविवारला सायंकाळी ६ वाजता माता चौक (गुजरी चौक) नवरगांव येथे आयोजित करण्यात आले आहे.
हया कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर,प्रबोधन पर मनोरंजन करणार आहेत.नवरगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व सौदंयीकरणाचा लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाचे उदघाटक तथा सत्कारमुर्ती मा. ना. विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते महाराष्ट करणार असून ह्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष.र्अंँड.राम मेश्राम माजी नगराधय्क्ष नगरपरिषद गडचिरोली,प्रमुख अतिथि रमाकांत लोधे सभापती कृषि उत्पन बाजार समिती सिंदेवाही, राहुल बोडने सरपंच नवरगांव, दिपक चहांदे, नागोराव राहाटे, प्रकाश चहांदे, पांडुरंग वाघमारे, आदी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तरी हया कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक शहर कांग्रेस कमिटी तथा बौध्द नगर स्मारक समिती नवरगांव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here