
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनीन्युज
विद्यापीठाच्या मैदानावर भाजप युवा मोर्चा कडून ४ मार्चला ‘राष्ट्रीय नमो युवा संमेलन’ होणार आहे. हा पक्षाच्या सभेचा कार्यक्रम विद्यापीठाच्या मैदानात होणार आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जननालाल बजाज प्रशासकीय परिसराजवळ असलेल्या विद्यापीठाच्या मोकळ्या मैदानावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या ‘राष्ट्रीय नमो युवा संमेलन’ सभेचे चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नागपूर विद्यापीठाने परवानगी दिली असून ती तात्काळ रद्द करावी.
सोमवारी शैक्षणिक परिसरातील मैदानात राजकीय पक्षाचा कार्यक्रम होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष आहे. विद्यापीठाने राजकीय पक्ष व त्यांच्या संघटनांना कार्यक्रमासाठी मैदान देण्याच्या निर्णयाचा आम आदमी पार्टी तीव्र निषेध करत आंदोलन केले. भाजयुमोकडून ४ मार्चला ‘राष्ट्रीय नमो युवा संमेलन सभा ’ होणार आहे. यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा युवकांना मार्गदर्शन करतील असं म्हटल्या जात आहे . संमेलनात राज्याच्या वेगवेगळ्या भागातील एक लाख लोक सहभागी होतील. हा सोहळा विद्यापीठाच्या मैदानात होणार आहे.
हा सर्व शैक्षणिक परिसरा मध्ये भाजपचे झेंडे लागतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष येत आहे. एक लाख लोकांची गर्दी या परिसरात होईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या परिसरात अनेक विभाग आहेत. तिथे नियमित वर्ग चालतात. विद्यापीठाची लायब्ररी आहे. पूर्ण परिसरामध्ये जवळजवळ चार ते पाच हजार विद्यार्थी असतात. जे सर्व विद्यार्थी होत करू खेड्यापाड्यावरून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येतात. आणि हा राष्ट्रीय युवा संमेलनाच्या सभे चा कार्यक्रम जो एका पक्षाचा आहे. ज्याचा विद्यार्थी हितासाठी कुठलाही संबंध नाही. अशा कार्यक्रमाला विद्यापीठाने सोमवारी शैक्षणिक परिसरात भव्य सभा घेण्याची परवानगी दिली. हे नैतिकच्या पातळीवर तरी विद्यापीठ प्रशासनाला शोभतं का? शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी सदैव विद्यार्थी हितासाठी आणि शिक्षणासाठी काम करत आहे. नागपूर विद्यापीठ मध्ये असे राजकीय पक्षाचे कार्यक्रम होऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ आम आदमी पार्टी कधीही होऊ देणार नाही. असे प्रदेश सचिव आम आदमी पार्टी यांनी म्हटले.
“विद्यापीठ प्रशासनाला विनंती केली असून त्यांनी तात्काळ भारतीय जनता पार्टीचा तात्काळ कार्यक्रम रद्द करावा. जर असे केले नाही आम आदमी पार्टी नागपूर विद्यापीठाच्या समोर विद्यार्थी हितासाठी तीव्र आंदोलन उभारेल.किंवा न्यायलयीन लढाई उभारेल. असे आम आदमी पार्टी चे वरिष्ठ नेते डॉक्टर शाहिद जाफरी यांनी सांगितले.
निवेदन देण्यासाठी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कडे गेले असताना कुलगुरूंच्या कक्षाला कुलूप लागून होते. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते कुलगुरूंच्या कक्षा बाहेरच ठाण मारून बसले तरीही कुलगुरूंचा येण्याचा पत्ता नाही. तेव्हा पोलिसांच्या मध्यस्थीने विनंती करून बोलवण्यात आले. तेव्हा सदर निवेदन कुलगुरू ला देण्यात आले. कुलगुरूंनी सांगितलं की हे माझ्या एकट्याच्या सहमतीने झाले नाही व्यवस्थापन परिषदेच्या 27 तारखेच्या मीटिंगमध्ये या विषयावर त्यांनी शिक्का मोर्तब केली. याच गोष्टीला दुजोरा प्र कुलगुरू दुधे यांनी दिला.त्याला अटी सुद्धा देण्यात आला. या अटी यापुढे सर्वच पक्षांना लागतील का? सोमवार या दिवशी विद्यापीठ परिसरातील विभागांना सुट्टी देण्यात आली का? भाजपचा कार्यक्रम करण्यासाठी त्यांना सक्तीच्या ताकीद दिली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहे. शैक्षणिक परिसर विद्यार्थी हितासाठी असतो राजकीय पक्षांचे कार्यक्रम घेऊन कुठलं हित व्यवस्थापन व्यवस्थापन परिषद व कुलगुरू प्रमोद बोकारे साहेब करत आहे हे कळायला मार्ग नाही. देशात सत्तेचा खरा दुरुपयोग आता विद्यापीठांमध्ये सुरू झालेला आहे.असे शहर सचिव सचिन रामकृष्ण वाघाडे यांनी सांगितले.
आम आदमी पार्टीचे युवा आघाडी प्रमुख शुभम मोरे, युवा उपाध्यक्ष तेजराम साहू,प्रतीक बावणकर, सचिन लोणकर संघटणं मंत्री, अरुणज्योती कन्हेरे शहर महासचिव, मोहन मांगर, संगीता बाथो,लक्ष्मी खालगोने, नरेश महाजन, प्रदीप पौनीकर, हेमंत पांडे, कैलास कावला, पंकज मेश्राम, शहर महासचिव अमेय नरनावरे, शैलेश गजभिये, पुष्पा डाबरे, दीपक भातखोरे, पिंकी बारा पात्रे व शेकडो पदाधिकारी आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीचे आघाडीचे पदाधिकारी सोबत शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.














