ठाणेदाराच्या अवैध धंदे बंद करण्याच्या लेखी आश्वासनाने माजी सरपंच साबेर पठान यांच्या उपोषणाची सांगता

0
31

बुलढाणा प्रतिनिधी

सिद‌खेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत गावागावात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावे यासाठी भाजप कोअर कमिटीचे सदस्य माजी सरपंच साबेर पठाण यांनी साखरखेर्डा येथे उपोषण सुरू केले होते याची दखल घेत ठाणेदाराने अवैध धंदे बंद करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने साबेर पठान यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली.
साखरखेर्डा पोलीस स्टेशन च्या हद्दीत असलेल्या अवैध धंदे बंद करावे यासाठी साखरखेर्डा येथे आज शुक्रवारला उपोषण सुरू करण्यात आले होते या उपोषणाला माजी आमदार तोताराम कायंदे यांनी भेट देऊन ठाणेदार चर्चा केली उपोषणाला वाढती गर्दी बघता पोलिसांनी लगेच अवैध धंदे बंद करण्याचे ठाणेदार यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली यावेळी जमादार निवृत्ती पोकळे भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष शेख जावेद मा पंचायत समिती सदस्य रफिक प्यारे उल्हास देशपांडे तंटामुक्ती अध्यक्ष हानीप बागवान प्रभाकर ताठे माऊली मुंढे ॲड निशिकांत राजे जाधव जालमसिंग ठाकूर आदी स ह अनेक जण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here