शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा लोकसभा मतदानावर बहिष्कार

0
66

बळीवंश लोकचळवळ करणार प्रत्येक गावा गावात जनजागृती

बुलढाणा प्रतिनिधी

सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या सातत्याने बळीवंश चळवळी च्या माध्यमातून आम्ही प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मांडत असून शेतकरी हा देशाचा कणा असून शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून याबाबतची जनजागृती प्रत्येक गावा गावा त करणार असल्याचे बळी वंश चळवळी चे नितीन कायंदे यांच्या बळी वंश चळवळी कार्यकर्त्याने करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सिंदखेड राजा मतदारसंघात जवळपास ९० % मतदार हा शेतकरी आहे परंतु असे निदर्शनास येत आहे की वर्षानुवर्षे त्याच त्याच समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत व दरवर्षी नवं नविन संकटांची त्यात भर पडत आहे. कितीही वेळा शासन दरबारी या समस्या मांडल्या तरी त्यावर कसलाही तोडगा निघताना दिसत नाही.
आम्ही राष्ट्रमाता स्वराज्य जननी मा जिजाऊ यांच्या भूमीतील स्वाभिमानी शेतकरी आहोत त्यामुळे या सरंजाम शाहीला नक्कीच खंबीर मोडून काढू.

खालील समस्यांवर काहीतरी ठोस तोडगा निघावा अशी आशा आहे
१ मागील सर्व थकीत रकमा शेतकऱ्यांना तात्काळ अदा करण्यात याव्यात त्यामध्ये २०२१ ते २०२३ चे दुष्काळ निधी, अतिवृष्टी मदत व नोव्हेंबर २०२३ चे गारपीट व २७ फेब्रुवारी २०२४ ला झालेल्या गारपीट ग्रस्त शेडधारक तथा शेतकऱ्यांना निधी वाटप तात्काळ करावे.
२ पंतप्रधान तथा मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी पासून वंचित शेतकऱ्यांचा सर्वे करून त्यांना तात्काळ या योजनेत सहभागी करावे.
३ सोयाबीन, कापूस व हरभरा चे दर वाढविण्यासंदर्भात शासनाने ठोस उपाययोजना कराव्या,कारण दरवेळी आंतरराष्ट्रीय दर बाबत पळवाट सरकार काढू शकत नाही,
४ वन्यप्राणी साठी असणाऱ्या उपाययोजना शासनाने अधिक कठोर कराव्या, ज्या मध्ये रोही या प्राण्याला पारध करण्याची परवानगी द्यावी व नुकसान भरपाई देण्याची पद्धत बदलावी, शेतकऱ्यांना अर्ज करून ६-६ महिने झाले आहेत तरी मदत मिळाली नाही, त्यांना ती मदत सव्याज तात्काळ मिळावी.
५ सद्या आपला भाग भूगर्भ विभागाच्या अनुसार सेमी क्रिटिकल झोन मध्ये येतो त्यामुळे MREGS अंतर्गत वैयक्तिक विहीर खोदण्यास बंदी आहे परंतु दुसरीकडे सामूहिक विहिरींना मात्र तातडीने परवानगी मिळत आहे, त्याच धर्तीवर वैयक्तिक विहिरींना देखील परवानगी द्यावी.
६ अनेक योजनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागतात त्यासाठी शेतकरी संपूर्णतः CSC केंद्रावर अवलंबून असतो, अनेक केंद्राचालक सहकार्य करतात परंतु काही जण मनाला येईल तसे भाव लावून शेतकऱ्यांची लूट करत आहेत त्यासाठी संबंधित यंत्रणेने दरपत्रक प्रत्येक CSC केंद्रावर लावावे व याची काटेकोर अंमलबजावणी करावी.
तसेच प्रत्येक ग्रा प कार्यालयात मोफत csc केंद्र सुरू करावे.
७ शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना समृद्धी महामार्गावर टोल माफी द्यावी.
८ ज्या ज्या परिसरात दुष्काळ जाहीर केलेला आहे त्या परिसरात वेगळे निकष, पंचनामे न करता सारसगट पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा.
१० शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी द्यावी तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५०००० रु प्रोत्साहनपर भत्ता द्यावा
या समस्येवर ठोस तोडगा काढून तात्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा आम्ही येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकू.
असा इशारा बळीवंश चळवळी च्या कार्यकर्त्यांनी केला आहे.यावेळी तालुक्यातील तब्बल ३२ गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावीगावी करणार जनजागृती
बळीवंश लोकचळवळ कोणतही आंदोलन गावगाड्यात नेण्यास आग्रही असते, आधी केलेल्या वन्यप्राणी विरोधी आंदोलनात तब्बल ५४ गावात उपोषण केले हॉटेज त्याच धर्तीवर याही आंदोलनाची प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करणार आहे असे बळीवंश चे नितीन कायंदे यांनी कळविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here