prabodhini news logo
Home चंद्रपूर भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्राचे वाटप होणार-तहसीलदार संदीप पानमंद

भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्राचे वाटप होणार-तहसीलदार संदीप पानमंद

0
149

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जसे आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र मिळण्यास सर्वसामान्य नागरिकांना अडचणी व विलंबास सामोरे जावे लागत असल्याने सदर दाखले तत्परतेने मिळण्यास करावयाची उपाययोजना याबाबत मा. जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांचेकडून प्राप्त निर्देशानुसार सिंदेवाही तालुक्यात दि. ०४.०३.२०२४ रोजी पवनाचक आणि पळसगाव जाट तसेच ०५.०३.२०२४ रोजी कळमगाव गन्ना आणि नवरगाव येथे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यादिवशी संबंधित गावातील आणि ग्रामपंचायत कार्यालय येथे तलाठी, मंडळ अधिकारी, आपले सरकार सेवा केंद्र चालक, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, पुरवठा विभाग कर्मचारी उपस्थित राहणार असून तालुक्यातील सर्व भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार संदीप पानमंद यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here