
प्रणित नामदेव तोडे
जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर
आपणांस जाणीव आहे की अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरु जी, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. जी.महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल दादा राऊत, राष्ट्रीय नेते रोशन लाल बिट्टू जी, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भान चिब जी, सहप्रभारी कुमार रोहित जी, एहसान खान जी, सर्व पदाधिकारी व कार्यकते, हे विद्यमान भाजप सरकारच्या जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या धोरणांवर तसेच सर्वसामान्य जनतेला भेडसावणान्या महागाई आणि भ्रष्टाचार यासारख्या गंभीर विषयावर जागरुकता निर्माण करण्यासाठी दिवसरात्र झटत आहे. धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक विकास देणारे काँग्रेस सरकार राज्यात व देशात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत तसेच आपले नेते भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत तरी आपण सर्वांनी भारत जोडो न्याय यात्रा मध्ये सहभागी व्हावे आणि यात्रेची शोभा वाढवावे.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खरगे जी, मा. सोनिया गांधी जी, काँग्रेस पक्षाचे व आपल्या सर्वांचे लाडके नेते मा. खा. राहुल गांधी जी यांचे हात बळकट करण्यासाठी प्रदेश युवक कांग्रेसला सर्वसामान्य युवकांचे हक्काचं व्यासपीठ करण्यासाठी आपण दिवसरात्र मेहनत घ्याल अशी आशा व्यक्त करतो .















