prabodhini news logo
Home चंद्रपूर मिनघरी येथे भव्य कृषि उद्योग तथा स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

मिनघरी येथे भव्य कृषि उद्योग तथा स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

0
102

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

*आमचा गाव आमचा विकास समितीचे आयोजन *

आमचा गाव आमचा विकास समिती मिनघरी यांच्या वतीने आयोजित मिनघरी येथे ११ मार्च ला कृषि उद्योग तथा स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय मिनघरी या ठिकाणी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक इंजिनीअर अमोल वाघमारे बार्शी जिल्हा सोलापूर
हे असणार आहेत.
शासकीय अनुदान प्राप्त उद्योग
ज्यामधे पशुखाद्य निर्मिती, शेळीपालन, कुक्कुटपालन, आणि शेती विषयक माहिती देण्यात येणार आहे. तरी परिसरातील सर्व शेतकरी तथा युवा वर्गाने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन समितीने केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here